
हिमायतनगर| संत माऊली वारकरी प्रतिष्ठान एकंबाच्या वतीने हिमायतनगर तालुक्यातील वृद्ध कलाकाराची निवड करून मानधन मंजूर करून देण्यात यावे अशी मागणी संत माऊली प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष हभप. प्रभू महाराज पिटलेवाड यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.


त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, हिमायतनगर तालुक्यातुन निवड मंडळावर कोणता सदस्य घेतला आहे. घेतला नसेल तर निवड समितीवर तालुक्यातील एक तरी सदस्य घेण्यात यावा. लोक कलावंताचा भरणा कलेच्या माध्यमातून करावा. जाहीर प्रगटन काढावे त्याचबरोबर कला सादर करूनच कलाकारांना प्रस्ताव मंजूर करण्यात यावे अशीही त्यांनी या निवेदनात मागणी केली आहे.


हिमायतनगर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये कलाकार आहेत. काही ठराविक गावांच्या कलाकारांचा भरणा करून नेहमी खऱ्या कलावंतांवर अन्याय होतो आहे. ही बाब लक्षात घेता प्रत्येक गावा मधून किमान एक तरी वृद्ध कलाकाराची निवड करून मानधन मंजूर करण्यात यावे. अशी मागणी संत माउली वारकरी प्रतिष्ठान एकंबा ता. हिमायतनगरचे तालुका अध्यक्ष प्रभू पिटलेवाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सांस्कृतिक विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे केली आहे.

