
उस्माननगर। येथून जवळच असलेल्या पंचशील बुद्ध विहार शिराढोण ता. कंधार येथे दि.२८ जानेवारी २०२३ रोज शनिवारी सकाळी संबोधी ग्रंथालयाचे उद्घाटन व धम्म शिबिराचा समारोप आणि पु.भदन्त बी.महाथेरो यांच्या शुभहस्ते भगवान गौतम बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनाचे आयोजन करण्यात आले आहे.


दि.२७ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वा. राष्ट्रीय महामार्गावरील सिडको नवीन नांदेड येथील रमाई आंबेडकर चौक येथून मोटरसायकल वरून ते पंचशील बुद्ध विहार शिराढोण पर्येत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक मंगलमय वातावरणात काढण्यात येणार आहे.बुध्द मूर्तींचे जागोजागी मंगलमय स्वागत करण्यात येणार आहे.


गावात प्रमुख रस्त्याने मार्गक्रमण करीत स्वागत करण्यात येईल.दि.२८ जानेवारी २०२३ रोज शनिवारी सकाळी ११ वा. संबोधी ग्रंथालयाचे उद्धघाटन तथा प्रमुख मार्गदर्शक आदरणीय डॉ.भिमराव यशवंतराव आंबेडकर ( राष्ट्रीय कार्याध्यक्ष , भारतीय बौद्ध महासभा तथा अध्यक्ष समता सैनिक दल ) यांच्या शुभहस्ते होणार आहे.तर यावेळी प्रमुख उपस्थिती मा.एस.के.भंडारे ( रा.उपा.तथा प्रभारी म.रा. व स्टाॅप ऑ.स.सै.दल मुंबई ) मा.बी.एम.कांबळे ( रा.सचिव तथा प्रभारी तेलंगणा राज्य ) यांची उपस्थिती लाभणार आहे.


त्यानंतर लागलीच भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पुज्या भदन्त बी.संघपालजी महथेरो ( राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तथा राष्ट्रीय अध्यक्ष भिक्कु संघ ) यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.पी.एम. वाघमारे ( भारतीय बौद्ध महासभा, जिल्हाध्यक्ष दक्षिण नांदेड ) हे राहणार आहेत.

तर स्वगताध्यक्ष मा.माधवदादा जमदाडे ( रिपब्लिकन सेना , मराठवाडा अध्यक्ष ) हे असणार आहेत.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गोविंद नांदेडे ( सेवानिवृत्त शिक्षण संचालक महाराष्ट्र ) शिवाजीराव कपाळे ( सेवानिवृत्त उप.कार्यकारी अधिकारी) प्रा . शास्त्रज्ञ डॉ. सिध्दार्थ एम.जोंधळे ,शिवाभाऊ नरंगले ( जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी , नांदेड) डॉ.करूणाताई जमदाडे , संबोधी सोनकांबळे ,दैवशाला गायकवाड , अशोकराव जोंधळे ,सपोनि पी.डी.भारती , खुशाल पा.पांडागळे , पांडुरंग पवार , व्यंकटराव पाटील पांडागळे , भगवानराव कपाळे ,डी.डी.भालेराव एस.बी.पवार ,आर.वाय.सावते , डॉ.महेंद्र सांगवीकर ,प्राचार्य डॉ.कमलाकर राक्षसे ,प्रा.डाॅ. सिध्दार्थ राक्षसे , यांची उपस्थिती लाभणार आहे.

रात्रीला आठ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक मनोजराजा गोसावी ( नागपूर ) सुवासिनी शिंदे ( मुंबई ) आकाशराजा ( यवतमाळ ) यांच्या प्रबोधन पर भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी परिसरातील श्रध्दावान उपासक,उपासिकांनी शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष करण जमदाडे ( महार रेजिमेंट ) , उपाध्यक्ष भगवान राक्षसे ( शिक्षकत्तर संघटना ) व समस्त बौद्ध उपासक, उपासिका, गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
