
नवीन नांदेड। पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकर नगर सिडको नांदेड येथे राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, राजमाता जिजाऊ,राणी तुळसाबाई, विरागंणा झलकरीबाई यांच्या जयंतीनिमित्त महिला वाचक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम मा.प्रबोधनकार गोविंदराम शूरनर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.


कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून निवृत पोलीस निरीक्षक अधिकारी व्यंकटराव उतकर लाभले होते, तर प्रमुख पाहुणे प्रा.झकासताई पवळे,प्रा.किरणताई सलगरे, सुमनताई जिरोनेकर , यांची महापुरूषावर भाषणे झाली.


आध्यक्षिय भाषणात गोविंदराम शूरनर म्हणाले , राजमाता जिजाऊंनी शिवाजी घडविला म्हणून स्वराज्य निर्माण झाले. विरांगणा राणी तुळसाबाई होळकर, विरांगणा झलकरीबाई यांचे देश स्वातंत्र्यासाठी रणागंनात लढता लढता वीरगती प्राप्त झाली. ज्या काळात शिक्षण शिक्षण शिकणे हे पाप असुन धर्म बुडतो असा धर्म सांगतो म्हणून शिक्षणावर बंदी होती. त्या काळात महात्मा जोतीराव फुले नी आपली पत्नी सावित्रीबाईंना शिकविले व स्त्री शिक्षणासाठी शाळा काढल्या त्या शाळेच्या शिक्षिका बनण्याचा मान भारतात पहिला मिळाला.


त्या शिक्षिकेला पुण्यातील उच्चवर्णियानी शेणमारा केला तरी सावित्री फुले नी न डगमगता शिक्षणाचे कार्य चालुच ठेवून त्या भारताच्या राष्ट्रमाता ठरल्या , तिचे आदर्श आजच्या स्रिने घेवून घरा घरात वाचन संस्कृती जपली पाहिजे ,आपल्या मुलांवर शिक्षण, संस्कार,संघटन व संघर्ष या चार गोष्टींचे संस्कार करून स्वावलंबी बनवावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रस्ताविक डॉ.गणपत जिरोनेकर यांनी केले. तर आभार ग्रंथपाल मदनेश्वरी शूरनर यांनी केले.
