नांदेड। जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील प्रश्न बाबत आज रविवारी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समन्वयकाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत धर्माबाद, बिलोली, देगलूर येथील समन्वयक उपस्थित होते.
बैठकीत महाराष्ट्र शासनाची भूमिका आणि तेलंगणा शासनाची दाखवलेली स्वार्थागणिक आस्था याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान तेलंगणा राज्याची आणि तेथील पदाधिकाऱ्यांची राजकीय मनोभूमिका आणि महाराष्ट्र राज्यातील पदाधिकाऱ्यांची सीमावर्ती भागाबाबत असलेली भूमिका याबाबत उघड चर्चा करण्यात आली.
यावेळी देगलूर चे समन्वयक तात्या देशमुख यांनी राजकीय पक्ष आणि या चळवळीचा संबंध कितपत योग्य अशी भूमिका घेतली यावर प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर यांनी तेलंगाना येथील भारत राष्ट्र समिती आणि प्रश्न सीमावर्ती भागाची चळवळ याचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. भारत राष्ट्र समिती ही आता स्थापन झाली आणि ही चळवळ 2018 पासून सुरू आहे. तेलंगणाच्या भारत राष्ट्र समितीचा आणि प्रश्न सीमावर्ती भागाचे चळवळ आणि समन्वयकाचा काहीही संबंध नाही.
तुमचे समन्वयक तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याशी संपर्कात आहेत का?आमच्या विकासाबाबत तेलंगणाचे पदाधिकारी विचारणा करत असल्यास यात गैर ते काय? असेही मुंडकर यांनी स्पष्ट केले. आमची भूमिका संयुक्त महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रात राहून सीमा भागातील विकास घडावा ही मूळ भूमिका. महाराष्ट्र हा मुंबई आणि पुण्यापुरता मर्यादित नाही. हे सुद्धा यावेळी ठणकावून सांगण्यात आले. मराठवाडा वैज्ञानिक विकास मंडळाच्या धर्तीवर तेलंगाना सीमावरती भागातील विकास मंडळ स्थापन करून विकास घडवून आणावा अशी आमची मागणी आहे.