
नांदेड। वर्धा साहित्य संघ शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे दिनांक 3,4 आणि 5 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडणार आहे. या संमेलनात निमंत्रित साहित्यिकांची/ कवींचीकवी कट्टा या मंचावरून सादरीकरण होणार आहे.


यासाठी नांदेड जिल्ह्यातील रहिवासी सौ. रुचिरा बेटकर यांची निवड करण्यात आली आहे. मराठी साहित्या प्रती आवड असलेल्या व सतत त्यांचे लेख,कथा, कविता असे साहित्य विविध वृत्तपत्रातून, मासिकातून सतत वाचण्यास मिळतात. 3 फेब्रुवारी रोजी कविता सादरीकरणासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण सौ. रुचिरा बेटकर यांना आले आहे. 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

