
जयपूर/नांदेड। नांदेडचे ऍड.निखिल कैलास खंडेलवाल यांची अखिल भारत वर्षीय श्री खाण्डल विप्र महासभा युवा संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ऍड.निखील खंडेलवाल यांच्या नियुक्ती पत्रावर राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल बोचिवाल आणि युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शाम चोटीया यांची स्वाक्षरी आहे.


अखिल भारतीय वर्ष जुन्या खाण्डल विप्र महासभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहनलाल बोचीवाल यांचा शपथविधी सोहळा काल दि.22 जानेवारी रोजी राजस्थानमधील जयपूर शहरात झारखंड पॅलेसमध्ये पार पडला. शपथविधी सोहळा संपल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल बोचीवाल यांनी खंडेलवाल समाज संघटनेसाठी संपूर्ण भारतभर परिश्रम घेतलेल्या व्यक्तींचे नामनिर्देशन कार्यकारणीत केले.


नांदेड येथील ऍड. निखिल कैलास शर्मा (झिकनाडिया) यांची युवा संघटनेच्या अखिल भारतीय उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. ऍड.निखील खंडेलवाल यांचे चार आजोबा श्री.बन्सीलालजी, श्री.बद्रीनारायणजी,श्री.रामचंद्रजी आणि श्री.द्वारकादासजी, मोठे काका श्री.सुरेशजी, श्री.रमेशजी आणि वडील श्री.कैलासजी यांनी आपल्या जीवनात खंडेलवाल समाजासाठी भरपूर योगदान दिले होते. तिसऱ्या पिढीनंतर झिकनाडीया कुटूंबाला भारतीय संघटनेत स्थान देण्यात आले.


काही कारणास्तव ऍड. निखिल खंडेलवाल या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. अखिल भारतीय युवा संघटनेच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे व त्यांचा गौरव केला. नांदेड मुख्य खंडेलवाल समाजाच्यावतीने श्री.घनशामजी बोचीवाल, श्री.नंदकिशोरजी बोचीवाल (धर्माबाद), नांदेड येथील नंदलाल शर्मा (पिपलवा), रामप्रसाद चोटिया (खंडेलवाल), नरसिंगराज शर्मा (राजू सेवदा), विजय झिकनाडीया, अनुलाल पिपलवा, द्वारकादास माटोलिया, विजय सेवदा, गोविंद बनसा, राजेश सुंदरीया, प्रशांत सुंदरीया, गोपाल जोशी, ऍड.दिपक बढाढरा (शर्मा), जितेंद्र माटोलिया, ऍड.संजय खंडेलवाल (बोचीवाल), शिवप्रसाद डिडवानिया, शैलेश झिकनाडिया, निहाल झिकनाडिया, कैलास काछवाल, नरेंद्र रुथला, उमेश परवाल, धीरज बढाढरा (शर्मा), अशोक झुनझुनोदीया, आशुतोष सेवदा, निहाल झिकनाडीया , डॉ.दिपेश शर्मा (माटोलिया), पियुष शर्मा, अर्जुन खंडेलवाल, सागर शर्मा, शैलेश रिणवा, महेंद्र पिपलवा, आकाश झिकनाडिया, आशुतोष चोटिया, सफल चोटिया, कुणाल उर्फ बाबा गोपीकिशन शर्मा (पिपलवा), मंथन बढाढरा (शर्मा) , निरज झिकनाडिया, आरुष झिकनाडिया, अंशुमन झिकनाडिया, अनिश झिकनाडिया, देवांग झिकनाडिया, रुद्रांश माटोलीया या सर्वांनी ऍड. निखिल खंडेलवाल यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र व नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच अखिल भारत वर्षीय श्री.खाण्डल विप्र महासभेने ऍड.निखिल कैलास शर्मा यांना राष्ट्रीय कार्यकारीणीत प्रतिनिधीत्व दिले आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर ऍड. निखिल खंडेलवाल यांनी खंडेलवाल समाजाला वचन दिले आहे की समाजाच्या प्रगतीसाठी आपण कोणतीही कमतरता ठेवणार नाही, खंडेलवाल समाजाचे नाव भारतात सर्वोच्च पातळीवर नेण्याचा प्रयत्न करेन. राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलालजी बोचीवाल आणि राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्यामजी चोटीया यांनी माझी नियुक्ती केली आहे, मी त्यांचा ऋणी आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताना मला कोणताही त्याग करावा लागला तर मी कधीही मागे राहणार नाही असे ते म्हणाले.

- राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रेरणादायी कार्य व कर्तत्वाचा वारसा आत्मसात करणे गरजेचे – समतादूत राणीपद्मावती बंडेवार -NNL
- खा.चिखलीकराकडून ना.गडकरी यांना चांदीच्या राम मंदिराची प्रतिकृती भेट -NNL
- मालेगाव रोडवरील शिवनेरी व शौर्य ढाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई -NNL
- कै. दिगंबर किशनराव पाटील मोरे -NNL