
लोहा| राज्यातील मागील सरकारने विना अनुदानित शाळा असो की शिक्षक- प्राध्यापकांचे प्रश्न असो त्याची सोडवणूक करण्यासाठी राज्यातील सत्ताधारी भाजप शिवसेना(शिंदे गट) सरकारने तातडीने सोडविण्याची भूमिका घेतली आहे. लोहा कंधार सह जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला आणि करत असतो. शिक्षक मतदार संघात भाजपा उमेदवार किरण पाटील यांना जास्तीत जास्त मतदान करावे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपा वचनबद्ध आहे .जिल्ह्यात मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वांनी भाजप उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले


लोह्याच्या श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयात औरंगाबाद शिक्षक मतदार संघातील भाजपा उमेदवार प्रा किरण पाटील यांच्या प्रचारार्थ जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शिक्षक मतदारांशी संवाद साधला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर तर व्यासपीठावर भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्राणिताताई देवरे चिखलीकर, प्राचार्य डॉ अशोकराव गवते पाटील, नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे ढाकणीकर,संस्थाचालक अवधुतराव क्षीरसागर होते यावेळी उपनगराध्यक्ष दता वाले ,प्रा डॉ डी एम पवार, माजी उपसभापती शंकर पाटील ढगे, माजी उपसभापती व प्रचार प्रमुख रोहित पाटील आंडगेकर , माजी उपसभापती लक्ष्मणराव बोडके, नरेंद्र गायकवाड,नगरसेवक भास्कर पाटील पवार, साहेबराव काळे, व्ही जी चव्हाण यासह मोठ्या संख्येने मतदार शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते


खा प्रतापराव पाटील यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेत बैठक घेण्यासाठी प्रा डॉ पुरूषोत्तम धोंडगे, ऍड मुक्तेश्वर धोंडगे ,यांचा विनंती केली प्राचार्य डॉ गवते यांनाही विनंती केली त्यामुळे ही बैठक होते आहे असे आरंभी नमूद केले. शिक्षकांच्या समस्या अडीअडचणी आम्ही जाणून आहोत जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी राज्यातील भाजप शिवसेना सत्ताधारी अनुकूल आहेत राज्याचे मुख्यमंत्री यांनी या बाबर सकारात्मक भूमिका घेतली आहे अनेक प्रश्न या सरकारच्या काळात मार्गी लागत आहेत. विद्यमान आमदारां विषयी नाराजी आहे पण प्रा किरण पाटील शिक्षकांसाठी धडाडीचे नेतृत्व आहे. त्यामुळे लोहा कंधार तालुक्यातुन जास्तीत मते मिळावी व जिल्ह्यात मतांची आघाडी मिळाली पाहिजे यासाठ सामूहिक प्रयत्नांची गरज आहे आणि आपण सर्वजण मतदार भाजपा उमेदवाराला मताधिक्य देणार आहात. असा आत्मविश्वास व्यक्त केला.


संत गाडगे महाराज विद्यालयात २००४ मध्ये भाई केशवराव धोंडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमा झाला होता . तब्बल १८वर्षा नंतर आज प्रतापरावा या संस्थेत गेले त्यामुळे राजकीय विरोध बाजूला झालेल्या या बैठकीला विशेष महत्त्व आहे .यावेळी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्राणिताताई देवरे प्राचार्य डॉ अशोकराव गवते यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक माजी उपसभापती शंकर पाटील ढगे यांनी केले संचलन पत्रकार विक्रम कदम यांनी तर आभार नगरसेवक भास्कर पाटील पवार यांनी मानले यावेळी श्रीसंगाम महाविद्यालयाच्या वतीने खा चिखलीकर व मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.
