
नविन नांदेड। नांदेडच्या ‘सिडको’ वसाहतीअंतर्गत एनडी-१, शिवाजी चौक परिसरातील रहिवासी गजानन देवराव देशमुख (वय-४२ वर्षे) यांचे २३ जानेवारी रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.


त्यांच्या पार्थिव देहावर २३ जानेवारी रोजी दुपारी त्यांच्या मुळगावी चिकाळा (ता. मुदखेड) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत गजानन देशमुख यांच्या अंत्ययात्रेत लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षांचे तथा सामाजिक संघटनांचे हजारो पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा सहभाग होता.


त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक भाऊ, भावजय, एक पुतणी, एक पुतण्या, तीन बहिणी व मेहुणे असा परिवार आहे. नांदेड वाघाळा शहर मनपाच्या स्थायी समितीच्या माजी सभापती तथा नगरसेविका मंगलाताई देशमुख यांचे ते पती तसेच कॉंग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते उदय देशमुख यांचे ते लहान बंधू होत.

