
नविन नांदेड। गौतमेश्वर संत संगम आळणी बुवा मठ संस्थान धनेगाव येथे २२ जानेवारी रोजी यात्रा निमित्ताने पालखी सोहळा,व विविध धार्मिक कार्यक्रम व परिसरातील भागात छोटे मोठ्या व्यावसायिक , महाप्रसादाचे दुकान यांनी परिसर गजबजून गेला, सकाळ पासून ग्रामीण भागातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी रावसाहेब महाराज यांच्या सह किर्तन व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

गौतमेश्वर यात्रे निमित्ताने दि.२२ जानेवारी २०२३ रोज रविवार माघ शु. १ शके १९४४ सकाळी ५ ते ८ रूद्र अभिषेक शुभहस्ते १००८ श्री युदबन गंबीर बन महाराज कोलंबी व सकाळी १० ते ०४ महाप्रसाद दुपारी १२ ते ३ किर्तन तरातिर्थ माहात्म, ह.भ.प.सखाराम महाराज सुकळीकर ह.भ.प.हरी महाराज येळेगावंकर यांच्ये व मठसंस्थानाचे रावसाहेब महाराज यांच्ये किर्तन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, संरपच पिंटू पाटील शिंदे, शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, राष्ट्रवादी दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गंगाधर कवाळे, विनायक शिंदे, अशोक शिंदे,शिवराज पाटील दुरपडे,माजी संरपच दिलीप गजभारे, संतोष पाटील कवाळे, माधवराव देशमुख,खलील भाई,प्रभाकर कवाळे, ज्ञानेशवर गायकवाड, दिंगबर शिंदे , विठ्ठल शिंदे व भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती, यावेळी रावसाहेब महाराज यांनी गौतमेश्वर संत संगम आळणी बुवा मठसंस्थान भावीक भक्तांच्ये जागृत देवस्थान असल्याचे सांगून गेल्या अनेक वर्षांपासून या देवस्थानाच्यी प्रचिती असल्याचे सांगितले.

यात्रे निमित्ताने सुकळी डोंगरकडा जिल्हा हिंगोली व येळेगाव तालुका हादगाव येथुन पालखी सोहळा आला यात अनेक भाविक भक्तांचा सहभाग होता तर यात्रे निमित्ताने परिसरातील भागातील प्रसाद,खेळणी , फुगे व विविध लहान मोठी दुकाने थाटली होती, परिसरात ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेनिमित्त भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

