
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। जिनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल तर्फे विद्यार्थी च्या सुप्त कला गुणांना वाव देणारे दर्जेदार कार्यक्रम सप्ताह दि,२१ पासून सूरू आहे. ह्यात नर्सरी ते १०वी पर्यतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, ह्यामध्ये कबड्डी, क्रिकेट,हॉलिबॉल,खो-खो,रस्सीखेच,लगंडी लिबु-चमचा,संगित खुर्ची, पोत्यामधील उड्या,धावणे, चित्रकला, नृत्य, गायन, विज्ञान प्रदर्शन ,आनंद मेळावा,स्नेहसंमेलन मैदानी स्पर्धा ई, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


माहूर येथील राजर्षी शाहू फॉउंडेशन संचालीत जिनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल येथे सोमवार दि,२३ रोजी सायन्स science exhibition व craft exhibition (विज्ञान प्रदर्शन) चे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प,स,चे माजी सभापती तथा पत्रकार वसत कपाटे,तर प्रमुख उपस्थिति पत्रकार संघाचे अध्यक्ष सर्फराज दोसाणी, प्रमुख पाहूणे राज ठाकूर, प्रा.वी.जी.गिरी याची उपस्थिती होती.


सुरुवातीला दीप प्रज्वलन व फित कापून प्रदर्शनास सुरुवात करण्यात आली आहे या विज्ञान प्रदर्शनी मध्ये १ते ९ विच्या विद्यार्थीनी भाग घेतला होता ह्यात हाड्रोलीक ब्रिज,रीमोटवर चालनारा रॉबेट.वायरलेस, थ्री,डी ओलोग्राम
सेक्र्युटि होम आलाराम , ट्रांसमिशन जलचक्र, जलशुद्धीकरण, जलसिंचन, हृदय निरोगी ठेवण्यासाठी चे प्रदर्शन, ग्लोबल वॉर्मिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ऊर्जा समस्या व व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, सांडपाणी निचरा तसेच रस्ते, उडाण पुल सह एकूण ७२ प्रयोग साकारले होते.


विज्ञानाचा वापर करून दैनंदिन जीवनातील कामे सुसह्य बनविणारी साधने, विज्ञानाच्या आधारे पर्यावरण संवर्धन करू शकणारी यंत्रणा आणि मोबाइल चार्जिंगपासून ध्वनी व हवा प्रदूषण रोखणाऱ्या यंत्रापर्यंतचा आविष्कार शालेय मुलांनी वैज्ञानिक उपकरणातून उलगडला आहे. सुमारे ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी जिनियस किड्स स्कूल मध्ये आज रोजी आयोजित अब्दुल कलाम विज्ञान प्रदर्शनात वेगवेगळ्या विषयावरील उपकरणांची निर्मिती करत आपल्यातील हुशारी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रचिती घडविली आहे.

विद्यार्थ्यांनी लहानसहान वस्तूंचा वापर करत घडविलेला आविष्कार पाहून प्रमुख पाहुणे ही भारावले.अशा विज्ञान प्रदर्शनाच्या विविध ७०.त ८० प्रकारचे प्रदर्शन विद्यार्थी ने बनवून आनले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजर्षी शाहू फॉउंडेशन तथा जिनियस किड्सचे संचालक भाग्यवान भवरे यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विध्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी पर पाडण्यासाठी जिनियस किड्सचे प्राचार्य- सुधीर गौरखेडे सर ,सचिव शीतल भवरे,प्रफुल भवरे,आकाश भवरे, शुभम भवरे,आयफाज शेख,प्रशांत देशमुख, शुभम गायकवाड, आकाश राठोड, सोहेल खान,राहुल गिऱ्हे, राजू गुलफूलवार, वैभव मुडणकर, विक्रांत चव्हाण, वर्षा कऱ्हाळे, पल्लवी पाटील, प्रतिभा पाटील,रचना निळे, पूजा कुंभारे, रितू वर्मा, मनीषा खाडे, अल्का राठोड, दातीर, अश्विनी भास्करवार, करिष्मा राठोड, रसिका राठोड, प्रियांका खांडेकर, प्रियांका वांगे, जानकी आराध्ये,संगीता ताई,लक्ष्मीताई यांनी परीश्रम घेतले,
