
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती दिनानिमित्त नायगाव येथील स्वराज मल्टिसर्व्हीस येथे दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळी ११:१५ वाजता युवा सेना तालुका प्रमुख शिवाजी कुंटूरकर यांच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी पत्रकार संघाचे माजी तालुका अध्यक्ष पुरस्कारप्राप्त माधव पाटील चव्हाण , दलित कैवरीचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ हणमंते,पत्रकार संघाचे तालुका कार्यध्यक्ष माधव धडेकर ,भगवान दादा भद्रे ,रघुनाथ दादा सोनकांबळे ,संपादक प्रकाश महिपाळे , नागनाथ बेंद्रीकर ,मिलिंद बच्छाव , माजी सरपंच शिवराज वारंवटे ,शंकर शिंदे अंतरगावकर आदींनी हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

