
नांदेड। वृत्तपत्र विक्रेत्यांची शिखर संघटना महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने 26 व 27 जानेवारी रोजी राज्यस्तरीय अधिवेशन राधा गोविंद सेलेब्रेशीन हाॅल जनकल्याण पतसंस्थे जवळ चैतन्यवाडी बुलडाणा येथे आयोजित करण्यात आले आहे.


26 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत केंद्रीय समितीची बैठक व त्या नंतर कार्यकारिणीची बैठक होईल रात्री 7 ते 9 सर्व साधारण सभा व खुली चर्चा होईल या अधिवेशनात वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासह विविध समस्या विषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत.


दुस-या दिवशी 27 जानेवारी रोजी सकाळी वृत्तपत्र विक्रेत्यांची रॅली , 11 वाजता या अधिवेशनाचे उदघाटन बुलडाणा अर्बन चे संस्थापक अध्यक्ष राधेशामजी चांडक यांच्या हस्ते होणार आहे .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुलढाण्याचे आमदार धर्मविर गायकवाड हे असतिल , कार्यक्रमाला बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव ,चिखलीचे आमदार सौ.स्वेता महाले ,सिंदखेड, राजाचे आमदार डाॅ.राजेंद्र सिंगणे,खामगांवचे आमदार अॅड. आकाश फुंडकर ,मलकापुरचे आमदार राजेश येकडे, जळगाव जा.चे आमदार डाॅ. संजय कुटे,मेहकरचे आमदार डाॅ. संजय रायपुरकर , जिल्हाधिकारी ह.पी. तुम्मोड ,नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे,जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार ,दै.देशोन्नतीचे राजेश राजोरे, यांच्यासह महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सुर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार , राजेंद्र काळे राज्य उपाध्यक्ष मराठी पत्रकार परिषद, चंद्रकांत बरवे , लक्ष्मीकांत बागडे आदी उपस्थित राहणार आहेत.


या अधिवेशनास नांदेड जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राज्य संघटनेचे कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत घाटोळ, जिल्हा उपाध्यक्ष गणेश वडगांवकर, कोषाध्यक्ष बाबु जल्देवार, अवधूत सावळे, संदिप कटकमवार,सतिश कदम, व्यंकटेश आनलदास, बालाजी चंदेल, विठ्ठल फडेवार, देवबा डोरले, बाबुराव बडुरे, भागवत गायकवाड, गजानन पवार, लख्खन नरवाडे, रामेश्वर पवार, माधव मामीडवार, आदीने केले आहे.
