
नवीन नांदेड। राजश्री पब्लिक स्कूल, लातूर रोड नांदेड या शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.


यावेळी संस्थेचे सचिव दिलीप पाटील संचालिका डॉ.सौ.कल्पना पाटील , व्यवस्थापक श्री. सुशांत पाटील मुख्याध्यापक बी. के. फुले , महेंद्र कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


शाळेतील विद्यार्थी तन्मय वाघमारे, सुप्रिया गायकवाड, श्रेया बेडदे, तेजस्वी चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेतील शिक्षक सुबोध पाटील, राजकुमार कोकाटे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी सखोल अशी माहिती दिली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

