
नांदेड। नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा संघटक पदी जेष्ठ पत्रकार प्रकाश जैन यांची निवड करण्यात आली असून परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी प्रकाश जैन यांच्या जिल्हासंघटक पदी नियुक्तीची घोषणा केली आहे.


परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी जैन यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास सुभेच्छा दिल्या आहेत. जैन यांच्या संघटक पदी झालेल्या नियुक्ती बद्दल सर्व पत्रकार व तसेच हिमायतनगर तालूका पत्रकार संघटनेच्या वतीने व मित्र मंडळीनी अभिनंदन करूण सुभेच्छा दिल्या आहेत.


प्रकाश जैन हे गेल्या अडीच दशकापासून पत्रकारितेत योगदान देत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवून परिषदेने त्यांची योग्य निवड केली आहे. या निवडीबद्दल परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टवीकर, सरचिटणीस मन्सूर खान, कोषाध्यक्ष विजय जोशी, विभागीय सचिव सचिन शिवशेटै, माजी पदाधिकारी चारूदत्त चौधरी, प्रकाश कांबळे, जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, प्रदिप नागपूरकर आदिंचे जैन यांनी अभार मानले आहेत.

