
नवीन नांदेड| शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्रबोस यांच्या जयंती निमित्त शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने २३ जानेवारी रोजी सकाळी गूरूगोविद सिंग अंध विघालय धनेगाव येथे अंध विध्यार्थ्यांना स्नेह भोजन या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुका संघटक तथा भायेगाव संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांनी केले होते.


कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हायाचे सहसंर्पक प्रमुख भूजंग पाटिल , जिल्हा प्रमुख दत्ता पाटिल कोकाटे, जिल्हा संघटक नेताजीराव भोसले, माजी सभापती नरहारी वाघ, सिडको शहरप्रमुख जितुसिग टाक , कामगार सेना जिल्हा प्रमुख ब्रिजलाल उगवे, तालुका उप प्रमुख अशोक वांगीकर, तालुका संघटक बालाजी भायेगावकर, सर्कल प्रमुख संभाजी पा. जाधव, संदिप जिल्हेवाड, गण प्रमुख आर्जुन पा.भोग, धनेगाव शाखा प्रमुख प्रभाकर पाटील गायकवाड बळीरामपुर सुनिलनगर शाखा प्रमुख ज्ञानेश्वंर बारतोडे ,तुप्पा येथील ज्ञानेश्वंर ढेपाळे, चेअरमन वडगाव नामदेव पाटील पुयड, युवासेनिंक साई शिंदे ,संतिश धन्दे ,यांचासह असंंख्य शिवसैनिकाची उपस्थीती होती. यावेळी उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिक यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी स्नेह भोजन वाढवून जयंती ऊत्साहात साजरी केली.

