
लोहा| जिल्हा मराठी पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी जाहीर केली यात लोहा येथील पत्रकार रत्नाकर महाबळे यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.


मराठी पत्रकार परिषेदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 22 वर्षा पासून रत्नाकर महाबळे यांनी संघटनेत काम केले आहे. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष अशोक पाबळे यांनी जिल्हा कार्यकारणीस मान्यता दिली जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या टीम मध्ये काम करण्याची संधी रत्नाकर याना मिळाली.


तालुका पत्रकार संघात त्यांनी सरचिटणीस म्हणून ही काही काळ काम केले आहे. लोहा तालुक्यातून जिल्हा पत्रकार संघाच्या यापूर्वी हरिहर धुतमल हे उपाध्यक्ष होते आता रत्नाकर महाबळे याना सहसचिव पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.तालुका पत्रकार संघाच्या वतीने रत्नाकर यांचे अभिनंदन करण्यात आला.

