
नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय सहा अंतर्गत अधिनस्त पथकाने मालमत्ता करापोटी थकबाकी असल्याने संबंधिताचे नळकनेकशन कट केले असून थकबाकी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरून जप्ती कार्यवाही टाळवी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ रईसौधदीन यांनी केले आहे.


आज दिनांक 23 जानेवारी रोजी आयुक्त डॉ.सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांच्या आदेशानुसार झोन क्रमांक 6 सिडको कार्यालय अंतर्गत डॉ राईसोदिन सहायक आयुक्त यांच्या आधी अधिनस्त पथक या मालमत्ता क्रमांक 4051002729 यांच्याकडे जप्तीसाठी गेले असताना मालमत्ता धारकांनी एकूण थकबाकी 169376 इतकी येणे बाकी होती भरण्यास नकार केल्यामुळे त्याचे नळ कनेक्शन कट करण्यात आले आहे. कर निरीक्षक सुधीर सिंह बैस, सुदाम थोरात ,वसुली लिपिक मारुती सारंग व मालू एनफळे नथुराम चौरे यांनी कारवाई केली आहे

