
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या समोर वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वैचारिक विचारातून गेल्या अनेक दिवसापासून युतीची बोलणी होत होती ती दिनांक 23 जानेवारी रोजी पूर्ण होऊन झालेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडी व शिवसेना युतीचे घोषणा करण्यात आल्याने त्यांच्या या निर्णयाचे शंकरनगर येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.


सविस्तर माहिती अशी की शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी भाजपाला शह देण्यासाठी युतीचा निर्णय घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही पक्षाच्या दोन्ही दिग्गज नेत्यांनी एकत्र येण्याची घोषणा घोषित केल्याने त्यांच्या या युतीच्या निर्णयाचे शंकरनगर तालुका बिलोली येथे वंचित बहुजन आघाडी व शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.


याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बिलोली तालुका कोषाध्यक्ष गंगाधर कांबळे, रामतीर्थ सर्कल प्रमुख धम्मानंद भेदेकर, शिवसेनेचे नायगाव तालुका नरसी सर्कल प्रमुख संतोष देशमुख, रामतीर्थ सर्कल प्रमुख शंकर पाटील पुयड, युवा सेना प्रमुख राम टेकाळे, टाकळी शाखाप्रमुख संजय बिरादार, संतोष गजलवाड शाखाप्रमुख किनाळा, दत्ता पाटील देगलूरे आधी सह अनेक वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

