
नवीन नांदेड। नांदेड शहरातील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी तथा वसरणी येथील रहिवासी अश्विनी मधुकर ढवळे यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदी निवड झाली आहे.


‘एमपीएससी’ अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे नांदेड येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी ॲड. अश्विनी मधुकरराव ढवळे (भालेराव) यांची नुकतीच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदी निवड झाली आहे.


ॲड. अश्विनी मधुकरराव ढवळे (भालेराव) यांच्या उपरोल्लेखित पदी झालेल्या निवडीचे वृत्त समजताच वसरणी येथील सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन गजभारे, आनंद पोवळे, महेश गजभारे, प्रकाश खराणे, अनिता गजभारे, सुनिता गजभारे, दैवशाला गजभारे, सत्वशिला गजभारे, छाया कदम, रमा पारडे, उषाबाई पोवळे, अरूणा सावळे, रमा पोवळे, ज्योती शिंगारपुतळे, सिंधू पोवळे, आशा गजभारे, पदमिनबाई खंदारे, सोदरबाई गजभारे तसेच त्यांचे सहकारी महिला मंडळींकडून अश्विनी ढवळे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

