
नवीन नांदेड। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आंबेडकर भवन,दादर येथील पार पडलेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडी-शिवसेना अधिकृत युतीची घोषणा झाल्यानंतर नांदेड येथे युवासेना-वंचित बहुजन युवा आघाडी यांच्या वतीने हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात २३ जानेवारी रोजी फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटुन जल्लोष साजरा करण्यात आला.


युती बाबत घोषणा झाल्यानंतर हडको येथे सायंकाळी ७ वाजता प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले.


यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश युवा कार्यकारिणी सदस्य अक्षय बनसोडे, युवासेना जिल्हाप्रमुख व्यंकटेश मामीलवाड,युवासेना तालुका प्रमुख संतोष हंबर्डे,संतोष देशमुख,युवासेना समन्वयक वैभव भारती,तालुका चिटणीस प्रवीण हंबर्डे,युवासेना शहरप्रमुख आनंद घोगरे, महासचिव शुद्धोधन कापसीकर,धनराज पाटील वरपडे, राज बुद्धे,सोनबा पाटील,वीरप्रताप सिंग टाक यांची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी गोपाल सिंग टाक, शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित असलेल्या पदाधिकारी यांनी नागरीकांना पेढे वाटुन आंनददोसत्व साजरा केला.

