
उस्माननगर। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदेड येथील नामवंत हेंडगे हाॅस्पिटल साठे चौक नांदेड यांच्या वतीने डोळ्यांचे व दातांचे भव्य तपासणी शिबिर २६ जानेवारी रोजी सकाळी आयोजन केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील नामवंत हाॅस्पिटल पैकी एक हेंडगे हाॅस्पिटल ( साठे चौक नांदेड ) असून येथील वैद्यकीय तज्ञ अधिकारी डॉ.रामचंद्र दत्तात्रय हेंडगे ( गऊळकर ) ( नेत्ररोग तज्ज्ञ), डॉ. नेहा रामचंद्र हेंडगे ( शिंदे ) ( मुख व दंतरोग तज्ञ ) अनेक वर्षांपासून रुग्णांची तपासणी करून योग्य असे मार्गदर्शन करून रूग्णांना सेवा पुरवित असतात. (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून डॉ.रामचंद्र हेंडगे यांनी जिल्ह्यातील गोरगरिब वयोवृद्ध, दिव्यांग, महीला, पुरुष रुग्णांनासाठी ५० रूपये अल्प दरात नोंदणी फी ठेवली आहे.

तज्ञ डॉक्टरांकडून संगणकाव्दारे नेत्र तपासणी , सवलतीच्या दरात चष्मे , मोतीबिंदू ,नासूर आणि पडद्याचे ऑपरेशन, दात काढणे , दात साफ करणे , गरजवंत रुग्णांनी हेंडगे हाॅस्पिटल साठे चौक येथील डोळ्यांचे व दातांचे भव्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन हेंडगे हाॅस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

