
हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात दि. 23 जानेवारी 2023 वार्षिक स्नेहसंमेलना निमित्य विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यापैकी गितगायन स्पर्धा उत्साहात पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. जी. एम. रणखांब हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भुरे. एस एस., प्रा. कमठे के.डी., प्रा. मोतेवार ए. पी. यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते . गितगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक गणेश गिमेकर यांनी मिळविला तर द्वितीय क्रमाक कु. निकिता आरटवार तर तृतिय क्रमांक कु.कोरेवाड भगवती या विद्यार्थिनिने मिळविला. कार्यक्रमाचे विभाग प्रमुख प्रा. प्रमोद मुक्कावार हे होते त्यांना श्री. एस. व्ही. सुवर्णकार यांनी अनमोल असे सहकार्य करून कार्यक्रम अतिशय दर्जेदार सादर केला.

कार्यक्रमात सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून प्रा. ताडकुले एस.के. यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले. वरील यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सन्माननिय सूर्यकांताताई पाटील, संस्थेचे सचिव श्री. अरुणजी कुलकर्णी साहेब, प्राचार्य श्री जी. एम. रणखांब, उपप्राचार्य प्रा.एल.टि. डाके यांनी अभिनंदन केले.

