अर्धापूर, निळकंठ मदने| सामाजिक चळवळीत काम करतांना कार्यकर्ता घडत असतो, त्यामुळे जनसामान्यांची कामे कळत नकळत होत असल्याने मनाला समाधान मिळते, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचे कौतुक वेळीच केले पाहिजेत असे प्रतिपादन काँग्रेसचे सरचिटणीस संजय देशमुख लहानकर यांनी विविध मान्यवरांचा सन्मान सोहळा कार्यक्रमात बोलताना केले आहे
अर्धापूर तालुक्यातील लहान येथे संजय लहानकर यांच्या वतीने दि.२३ रोजी शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारीता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यंक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय देशमुख लहानकर होते.तर प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार निळकंठराव मदने, सुभाष लोणे,ओमप्रकाश पत्रे, लक्ष्मीकांत मुळे, नगरसेवक सोनाजी सरोदे,उध्दवराव सरोदे, उदयकुमार गुंजकर, गुणवंत विरकर,सखाराम क्षीरसागर, माजी चेअरमन बाळासाहेब देशमुख, शिक्षक पतपेढीचे संचालक बालासाहेब लोणे, केशव दादजवार, श्याम शर्मा,दत्तराव लहानकर आदी उपस्थित होते.
यावेळीअनु.जाती.अनु.जमाती प्रशासकीय समितीच्या सदस्यपदी व मराठी पत्रकार परिषद सदस्यपदी निवड झाल्याने लहानचे भुमीपुत्र पत्रकार सुभाष लोणे व शिक्षक पतपेढीच्या संचालक पदी बहुमताने विजयी झाल्याने शिक्षक नेते बालासाहेब लोणे याबंधुचा व पुरस्कार प्राप्त शिक्षक केशव दादजवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी पत्रकार निळकंठ मदने,ओमप्रकाश पत्रे,उदयकुमार गुंजकर, लक्ष्मीकांत मुळे,डिगांबर मोळके, रामराव भालेराव, उद्धव सरोदे, सखाराम क्षीरसागर, गोविंद टेकाळे, गुणवंत वीरकर, शंकरराव ढगे, अनिल मोळके इरफान पठाण, संदीप राऊत शेख मोलासाब,शेख शकील आदी पत्रकार बांधवांचा शाल, पेन,पुष्प मालाने सन्मानित करण्यात आले.
पुढे बोलतांना संजय देशमुख लहानकर म्हणाले कि उत्पन्नाची अपेक्षा न ठेवता तालुक्यातील पत्रकारांनी चांगले काम आहेच पण सामाजिक कार्यात महत्वपूर्ण काम असून नेतृत्व घडविण्यासाठी कार्य आहे हे एक इतर क्षेत्रातील अनेक लोकांना मार्गदर्शक आहे अशा शब्दांत पत्रकारांचा सन्मान केला.यावेळी सुभाष लोणे, निळकंठ मदने, लक्ष्मीकांत मुळे, रामराव भालेराव आदी बालासाहेब लोणे,केशव दादजवार यांची मनोगतपर भाषणे झाली बालासाहेब देशमुख यांनी कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचलन करून शेवटी आभार मानले.
कार्यक्रम आयोजित करून यशस्वी करण्यासाठी चेअरमन सतिष लहानकर,आनंदा राणेवाड, प्रकाश पाटील इंगळे, बाबुराव हारण, गणेश देवडे, सुधिर देशमुख,ग्रा.प.सदस्य विजय सावंत,अशोक देशमुख,शेख हुसेन,मधुकर स्वामी,हारिदास राणेवाड,मधुकर देशमुख,,कोडिंबा दळवे, बाळासाहेब मोरे, विश्वनाथ दळवे, प्रभाकर बादलवाड,प्रभाकर अंबेकर, शंकर हापगुंडे, शिवशंकर दहिभाते,अरूण वाटोळे,डिगांबर चव्हाण यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.