Tuesday, February 7, 2023
Home भोकर हाळदा येथे आमचा गाव आमचा विकास अभियान आराखडा कार्यशाळा संपन्न -NNL

हाळदा येथे आमचा गाव आमचा विकास अभियान आराखडा कार्यशाळा संपन्न -NNL

by nandednewslive
0 comment

भोकर। तालुक्यातील हाळदा येथे दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी पंचायत समिती भोकर मार्फत आमचा गाव आमचा विकास राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा सन २०२३-२४ गणस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.  

या कार्यशाळेचे उद्घाटन गावच्या सरपंच सौ. सुमनबाई माधवराव नागमोड,यशदाचे प्रशिक्षक अमर आलवाड, प.स.चे विस्तार अधिकारी शेटवाड एस.टी.,मादसवार ए.एल., ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष गुलाबराव वडजे, पत्रकार बालाजी नार्लेवाड आदींच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या कार्यशाळेत यशदाचे प्रशिक्षक अमर आयलवाड यांनी ग्राम विकासाच्या संकल्पना सरपंचांनी प्रत्यक्षात कशा उतराव्या याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले.

आपल्या गावच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी विकास आराखडा आखावा. या आराखड्यात आरोग्य,कृषी,शिक्षण,विद्युत, महसूल,पाणी, अंगणवाड्या आदी विविध विभागातील जबाबदार कर्मचाऱ्यांना एकत्रित घेऊन त्यांच्या गरजेनुसार विकासाचा आराखडा बनवावा व प्राधान्य क्रमाने विकासाच्या बाबी पूर्णत्वाला नेण्यासाठी १४ वा वित्त आयोग व १५ वा वित्त आयोग यातील आराखड्या प्रमाणे निधीचा उपयोग करून सर्वांच्या सहकार्यातून काम केल्यास आपले गाव स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनू शकते असा आशावाद व्यक्त केला.तशेच जीपीडिपी आराखड्या बाबद सविस्तर माहिती देवुननबंधीत व अबंधीत क्षेत्रावर योग्य निधीचा उपयोग करून गावाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी मार्गदर्शन केले.

banner

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचलन ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष गुलाबराव वडजे यांनी केले तर आभार माजी सरपंच बालाजी नार्लेवाड यांनी मानले. या कार्यशाळेस हाळदा व पिंपळढव गणातील २२ गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, ग्रामसेवक मंडळी, मुख्याध्यापक,शिक्षक वृंद, आरोग्य सेविका,अंगणवाडी कार्यकर्त्या,आशा वर्कर आदिसह विविध कार्यालयाचे कर्मचारी मोठ्या उपस्थित होते. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सरपंच प्रतिनिधी माधवराव नागमोड, उपसरपंच गजानन करपे, ग्रामसेवक संतोष सीतावार, चेअरमन दत्तराव अक्कलवाड, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारीवृंद, आदिसह अनेकांनी आपले योगदान दिले.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!