Tuesday, February 7, 2023
Home हिंगोली पोफाळीचा वसंत फुलला; साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा -NNL

पोफाळीचा वसंत फुलला; साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा -NNL

by nandednewslive
0 comment

उमरखेड/पुसद। हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणारा आणि मागील पाच वर्षांपासून बंद असलेल्या पोफाळीचा वसंत सहकारी साखर कारखान्याचे बाॅयलर पुजन करून चिमणी पेटवण्यात आल्याने पोफाळीत खऱ्या अर्थानं ” वसंत फुलला ” असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. यामुळे परिसरात मोठा उत्साह आणि आनंदी वातावरण आहे.

हा अग्नी प्रदिपन सोहळा केवळ व्यावसायिक नसून तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करणारा आहे. त्यामुळेच प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यातील शेतकरी कुटुंबाच्या हस्ते पूजा करून शेतकरीराजा प्रति उतराई होता यावं एवढीच माफक अपेक्षा.

या पूजेला वेदराज ठेंगे व सौ. वैशालीताई ठेंगे रा. आरेगाव ता. पुसद, अंबादास ठाकरे व उषाताई ठाकरे रा. उटी ता. महागाव, प्रविण देवसरकर व सौ. रंजनाताई देवसरकर रा. देवसरी ता. उमरखेड, गंगाधर कदम व सौ. सुजाताताई कदम रा. फळी ता. हदगाव आणि अवधूत कदम व सौ. ललिताताई कदम रा. वारंगटाकळी ता. हिमायतनगर यांची उपस्थिती होती.

banner

याप्रसंगी गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील, वसंत साखर कारखान्याचे चेअरमन अजय देशमुख सरसमकर व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र कटियार, बाबुराव पाटील कोहळिकर, अॅड. रविंद्र रगटे,डॉ. सोमेश्वर पतंगे,प्रा. सुरेश कटकमवार,प्रीतेश पाटील, प्रसाद महले पाटील,दीपक कल्याणकर यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!