नविन नांदेड। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या वतीने सिडको -हडको परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त काढण्यात येणाऱ्या प्रभातफेरी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे ,ज्या शाळेनी सामाजिक बांधिलक , देशसेवा , शैक्षणिक, सामाजिक व ऐतिहासिक अशा वेगवेगळ्या विषयातुन समाज प्रबोधन करणारे देखावे सादरीकरण करणाऱ्या प्रभातफेरीला बक्षीसे देवुन सन्मानित करण्यात येणार आहे .त्यामुळे परिसरातील जास्तीत जास्त शाळानी या स्पर्धत सहभाग घेण्याचे आवाहन पत्रकार संघाकडुन करण्यात आले आहे .
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्य नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या वतीने दि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्य प्राथमिक , माध्यमिक शाळेतुन प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येते .या प्रभातफेरीतुन समाजप्रबोधन होणारे विषय समाजापुढे यावे व त्यातुन समाजातील अनिष्ठरुढी पंरपरा दुर व्हावी यासाठी वेगवेगळ्या विषय घेवुन प्रभातफेरी निघावी यासाठी संघाच्यावतीने ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
सदरील स्पर्धा २६ जानेवारी रोजी सकाळी शाळेतील ध्वजारोहण झाल्यानंतर सिडको- हडको परिसरातील मुख्य मार्गावर आयोजित केली आहे . यासाठी पाच परिक्षक नेमण्यात आले असून मुख्य मार्गावर हे परिक्षक परिक्षण करुन प्रथम, व्दितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिस देवुन गौरवण्यात येणार आहे .
यात सन्मान चिन्ह, पारितोषिक, प्रमाणपत्र देण्यात येईल ,एका विशेष कार्यक्रमात बक्षिस वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष किरण देशमुख, उपाध्यक्ष शाम जाधव, सचिव रमेश ठाकूर, कार्याध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे, कोषाध्यक्ष निळकंठ वरळे, सल्लागार तुकाराम सावंत,अनिल धमणे यांनी दिली .