उस्माननगर, माणिक भिसे। हिंदुह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने उस्माननगर येथील चौकात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस शिवसैनिक व अन्य कार्यकर्त्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी बालाजी पु. घोरबांड ,आमिन आदमनकर , जावेद सय्यद , सुनील पा.काळम हानमंत मोरे , संभाजी ईसादकर , रामदास सोनटक्के ( दाजी ) संभाजी अन्नपुर्णे , कमलाकर काळम , रामेश्वर ईसादकर पत्रकार लक्ष्मण कांबळे. यांची उपस्थिती होती .
ग्रामपंचायत कार्यालय उस्माननगर येथे सरपंच श्रीमती गयाबाई शंकरराव घोरबांड व ग्रामसेविका डी.शिंदे उपसरपंच सदर बाशीद शेख, व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी व्यंकटराव पाटील घोरबांड,बाबू पाटील घोरबांड, संजय वारकड, शिवशंकर काळे , कमलाकर शिंदे,माने आमिनशा फकीर, दत्ता पाटील घोरबांड,अफसर शेख , तसेच सद्दाम पिंजारी, परमेश्र्वर पोटजळे,संजय भिसे, ओमकार मोरे, गावातील नागरिक उपस्थित होते.