
नांदेड। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा परिषद,नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नांदेड व्दारा आयोजित राज्यस्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकूल,इनडोअर हाॅल,नांदेड येथे पार पडल्या.


या स्पर्धैत यशवंत महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थीनी आणि मान सन्मान स्पोर्ट असोशियन नांदेडची विद्यार्थीनी कु.स्वराली सुंदरराज वैद्य हिने (-४५k.g)तृतिय क्रमांक पटकावत ब्रांझ पदकाची मानकरी ठरली.


पदक वितरण कार्यक्रमात मंचावर सचिव राजेश जांभळे, वुशू चे मुख्य प्रशिक्षक डाॅ. प्रमोद वाघमारे,जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, राज्यक्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख,अक्षय जांभळे,वुशू प्रशिक्षक नफिस शेख यांची उपस्थिती होती.स्वरालीच्या या यशाबद्दल तिच्यावर सर्वस्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.या यशाचे सर्व श्रेय तिने प्रशिक्षक नफिज अहमद शेख यांना दिले आहे.

