
लोहा| औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात यावेळी परिवर्तन अटळ आहे.शिक्षकांच्या समस्या सोडविण्याची शिंदे- फडणवीस सरकार वचनबद्ध आहे. भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार प्रा किरण पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले.


श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयात औरंगाबाद शिक्षक मतदार संघातील भाजपा उमेदवार प्रा किरण पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित शिक्षक मतदाराच्या बैठकीत प्राणिताताई देवरे चिखलीकर बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर खा प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्राचार्य प्रा डॉ अशोकराव गवते पाटील, नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, उपनगराध्यक्ष दता वाले यासह मान्यवर उपस्थित होते.


भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी शिक्षकांच्या प्रश्नांची जण8व असलेले उमेदवार प्रा किरण पाटील यांच्या पाठीशी शिक्षकांनी ठामपणे उभे राहावे राज्यात शिंदें-फडणवीस सरकार शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निर्णय घेत आहेत.


यंदा औरंगाबाद विभाग मतदार संघात परिवर्तन अटळ आहे जिल्ह्याचे खासदार चिखलीकर तसेच भाजप पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली या भागातून जिल्ह्यातून मताधिक्य मिळावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आपणही मोठ्या संख्येने मतदान करून प्रा किरण पाटील यांना पहिल्या पसंतीचे मतदान करावे असे आवाहन प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले आहे यावेळी प्रास्ताविक माजी सभापती शंकर पाटील ढगे यांनी केले. मोठ्या संख्येने शिक्षक मतदार उपस्थित होते.
