
नांदेड| आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते प.पू. श्री श्री रविशंकरजी यांच्या नांदेड आगमनानिमित्त रविवार दि.22 जानेवारी रोजी शहरातील नवा मोंढा येथील विषालाक्षी मंडपात सार्वजनिक तीळगूळ स्नेहबंध समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी शैलपुत्री गट, महागौरी गट,महालक्ष्मी गट , चंद्रघंटा गट, कुलस्वामिनी गट, सरस्वती गट ,वैष्णवी गट या सात गटाची स्थापना करण्यात आली होती. या गटातील स्वयंसेवकांशी कार्यक्रमास येवू इच्छिणार्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षक तथा कार्यक्रमाच्या संयोजिका पंकजा देशपांडे यांनी केले होते. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी सहभागी महिलांना वाण , तीळगुळ देण्यात आले तसेच येत्या 1 फेब्रुवारी रोजी होणार्या महासत्संग कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात स्नेहलता खतगावकर, रंजना सांवत,माजी महापौर शैलजा स्वामी, जयश्री पावडे,गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा रेखा पाटील, उद्योजिका आदिती फरांदे, स्त्रीरोग तज्ज्ञ सविता चव्हाण, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे, जि.प.च्या उप.मु.का.अ. रेखा काळम, काँग्रेस डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी देवसरकर, मनपाच्या माजी सभापती अर्पणा नेरलकर, माजी जि.प.सदस्या पूनम पवार, मोनाली पाटील, माहेश्वरी कौडगे, अनिता पावडे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अरूणा जाधव, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा गायत्री तोष्णीवाल,भारतीय कला संस्कृती संवर्धन समितीच्या प्रवर्तक डॉ.सान्वी जेठवाणी, मेधा पवार यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणार्या मान्यवर महिला सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजिका पंकजा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहल वसमते ,छाया रणवीर,संध्या संगेवार, अर्चना कासराळीकर, मीनाक्षी पाटील, श्यामा कुलकर्णी,रागिणी महामुनी, शोभा बच्चेवार, दीपाली रायेवार, स्वाती येवतीकर, पूजा पोकर्णा, वत्सला मोरे , उर्मिला कुलकर्णी , अहिल्या मोरे आदींनी परिश्रम घेतले.

