
नांदेड| नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज सोमवार दिनांक 23 जानेवारी रोजी नांदेड जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली. कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार आपण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. तानाजी चिमनशेटे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी शेखर कुलकर्णी, गटविकास अधिकारी मयूर अंदेलवाड यांच्यासह जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.

