Saturday, June 3, 2023
Home अर्थविश्व बनावट सोन्याच्या दागिन्यांच्या विरोधात जागृतीसाठी ‘गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन महाराष्ट्र’ ची मुंबईत कार्यशाळा -NNL

बनावट सोन्याच्या दागिन्यांच्या विरोधात जागृतीसाठी ‘गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन महाराष्ट्र’ ची मुंबईत कार्यशाळा -NNL

by nandednewslive
0 comment

मुंबई/दादर| सोन्याच्या दागिन्यांचे अचूक व्हॅल्यूएशन कसे करावे, बनावट, कमी कॅरेटचे दागिने कसे ओळखायचे, बँकांशी करारनामे करताना बाळगावयाची सावधगिरी या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन, महाराष्ट्र या संस्थेने दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी कित्ते भंडारी सभागृह, गोखले रोड नॉर्थ, शिवसेना भवन जवळ(दादर पश्चिम), मुंबई येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत ही कार्यशाळा होईल. ही कार्यशाळा, सभासद असलेल्या ,नसलेल्या व्हॅल्युअर्स बांधवांना विनामूल्य आहे.

व्हॅल्यूएशन करताना व्हॅल्युअर्सचा ‘कोड ऑफ कण्डक्ट’ कसा असावा, त्यांनी एका पाठोपाठ एक १० टेस्ट करून व्हॅल्यूएशन कसे करावे, ग्राहकाचे अवलोकन करून त्याची मानसिकता कशी जाणावी, करारनामा करताना कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात इत्यादी बारीक सारीक गोष्टींची माहिती देण्यात येईल. व्हॅल्यूएशन क्षेत्रात काम करताना कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात याविषयी संस्थेचे ४० वर्षांपेक्षा अनुभव असलेले मान्यवर मार्गदर्शन करतील.

ऑगमाँट एंटरप्राईज प्रा.लि. च्या रिसर्च हेड श्रीमती रेनिषा चैनानी या प्रमुख पाहुण्यां म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यशाळेला एम एस एम ई (MSME) चे संचालक प्रफुल उमरे, ‘ गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन, महाराष्ट्र ‘ चे अध्यक्ष पुरुषोत्तम काळे, अनिल वाघाडकर, डॉ. आनंद पेडणेकर, राजेंद्र दिंडोरकर, नचिकेत भुर्के, चेतन राजापुरकर, राजाभाऊ वाईकर तसेच दीपक देवरुखकर ह्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) आणि एम. सी. एक्स. (MCX) यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा होत आहे.’गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन, महाराष्ट्र’चे संघटक भैय्यासाहेब भामरे, प्रशासकीय सचिव सतीश पितळे, सह खजिनदार कालिदास कांदळगावकर कार्यकारिणी सदस्य संजय वाघ व समीर शहा हे कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.ही कार्यशाळा, सभासद असलेल्या, नसलेल्या व्हॅल्युअर्स बांधवांना विनामूल्य असून चहा,नाश्ता, दुपारचे जेवण व संध्याकाळचा चहाचा समावेश आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!