नवीन नांदेड। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुना कौठा येथे आनंदनगरी मेळावा घेण्यात यात शाळेतील जवळपास 20 विधार्थी यांनी सहभाग नोदवुंन विविध विधार्थी यांनी बनविण्यात आलेल्या पदार्थातून पाच हजार रुपये जमविले.
21 जानेवारी रोजी जि.प.प्रा.शा.जुना कौठा येथे आनंदनगरी मेळावा घेण्यात आला.या आंनद नगरीचे उद्दघाटन नगरसेविका सौ.शांताबाई गोरे , शालेय समितीचे अध्यक्ष प्रल्हाद काळे, उपाध्यक्ष बालाजी गोरे,निळकंठ काळे, व शालेय समिती सदस्य व गावातील मु.अ.नव्हारे, वरिष्ठ शिक्षक पत्रे,शैबवार , पवार ,वरिष्ठ शिक्षिका सौ.कळसकर ,सौ.पवळे ,सौ.महाजन ,सौ.खमितकर व श्रीमती पठणे हे उपस्थित होते.
सर्व मुल व मुलीनीं भेळ पोहयाचा चिवडा, पेढा, वडापाव, गुलाब जामुन, शाबुदाना,पाणीपुरी जवळपास २० विधार्थी यांनी तयार करुन स्टाल लावले होते, यावेळी आणलेल्या खावुचा आनंद घेतलाआणि पालकांनी सुध्दा आनंद लुटला, यात जवळपास पाच हजार रुपये कमाई केली.