Tuesday, February 7, 2023
Home लाईफस्टाइल एस.टी.महामंडळ व विश्वासू प्रवासी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचा 150 लोकांनी घेतला लाभ -NNL

एस.टी.महामंडळ व विश्वासू प्रवासी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचा 150 लोकांनी घेतला लाभ -NNL

विश्वासू प्रवासी संघटनेचा स्तुत्य उपक्रम - डाॅ.रेखाताई चव्हाण

by nandednewslive
0 comment

नांदेड| आरोग्य हीच धनसंपदा असे आपण म्हणतो परंतु बसस्थानकातील चालक व वाहक, प्रवाश्यांच्या डोळ्याची वेळोवेळी काळजी घेणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हा अतिशय स्तुत्य उपक्रम बसस्थानक व विश्वासू प्रवासी संघटना राबवत आहे, असे प्रतिपादन डाॅ.रेखाताई चव्हाण यांनी केले.

त्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सुरक्षितता अभियान “सडक सुरक्षा जीवन रक्षा” मोहिमेचे औचित्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळ व विश्वासू प्रवासी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आज, दि. 24 जानेवारी राेजी येथील बसस्थानकात वाहक-चालक व प्रवाश्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिरात बोलत होत्या.

या शिबिराचे उद्घाटन नेत्रतज्ञ डाॅ. रेखाताई चव्हाण यांनी केले तर अध्यक्षस्थानी विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आगार प्रमुख आशिष मेश्राम, बसस्थानक प्रमुख यासीन खान यांची उपस्थिती होती.

यावेळी संघटनेचे कार्यालयीन प्रमुख इजिं.हरजिंदर सिंघ संधू व बसस्थानक प्रमुख,यासीन खान,यांच्या विशेष सहकार्यातून झालेल्या या शिबिरास पत्रकार संभाजी सूर्यवंशी, प्रा. ललिताताई कुंभार, नेहा शर्मा, रमाकांत घोणसीकर, गणपत पांचगे, दिगंबर पवार, बसस्थानकातील वरिष्ठ लिपिक नितीन मांजरमकर , वाहतूक निरीक्षक अविनाश भिसे, राजू निळेकर,चालक मठपती, नियंत्रक डि.व्ही.घोरंबाड, जसप्रित कौर, बी.एम शिंदे यांची उपस्थिती होती.

banner

आगारातील चालक – वाहक व तांत्रिक कर्मचारी यांच्यासह अनेक प्रवाश्यांचे डाॅ रेखाताई चव्हाण, भिवराज कलंत्री नर्सिंग इन्स्टिट्यूट सिडको नांदेड येथील परिचारिका पंचशीला लांडगे, शितल जोंधळे, नेहा वन्ने, पूजा भुरे यांनी नेत्र तपासणी केली. या शिबिराचा 100 चालक, वाहक व यांत्रिक प्रशासन कर्मचारी व 50 प्रवाश्यांनी तपासणी लाभ घेतला. शिबिराच्या शेवटी इजिं.हरजिंदर सिंघ संधू, व बसस्थानक प्रमुख यासीन खान यांनीआभार व्यक्त केले.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!