कंधार| विद्यार्थ्यांचे जीवन यशस्वीरीत्या घडवायचे असल्यास त्यांना विचाराचे स्वातंत्र्य ,कलेचे स्वातंत्र्य ,वैचारिक स्वातंत्र्य देऊन त्याच्या जीवनात विविध पैलू पाडल्यास तो जबाबदार नागरिक बनून देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. असे प्रतिपादन कंधार येथे आयोजित चित्रकला स्पर्धेत भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या अंतर्गत ग्लो अँड ग्रो पब्लिक स्कूल कंधार येथे येता नववी ते बारावी विद्यार्थ्यांचे चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे चिखलीकर ,कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी मधुकर मोरे,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रोहीत पाटील, भाजप कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड, गटविकास अधिकारी मांजरमकर साहेब, शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, भाजपा शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगिरे, माजी जिप सदस्य दत्तात्रय चंदनफुले, विस्तार अधिकारी संजय येरमे ,वसंत मेटकर , शहरउपाध्यक्ष शंतनु कैलासे, सुनील कांबळे,रजत शहापुरे, दिपक गोरे,सागर डोंग्रजकर, प्रविण बनसोडे यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना प्रणिताताई चिखलीकर म्हणाले की, विद्यार्थ्यांचा विकास जर साधायचा असेल तर विद्यार्थ्यांचा कलात्मक व गुनात्मक दोन्ही विकास होणे आवश्यक आहे. त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अभिनव शिक्षण पद्धती ही अमलात आणून दुरुस्त शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना त्यांचा विकास कसा साधता येईल त्यांचा व्यक्तिमत् विकासाबरोबरच शैक्षणिक विकास साधण्याचा प्रयत्न या परीक्षा पे चर्चा त्या माध्यमातून केला जात आहे असे ते म्हणाले.
यावेळी प्रणिता ताई यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विविध कार्याची चर्चा विद्यार्थ्यांसमवेत प्रश्न उत्तरे करून केली व विद्यार्थ्यांना बोलते केले. या चर्चात्मक विषय मांडणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ग्लो अँड ग्रो पब्लिक स्कूलचे सचिव शंतनू कैलास मुख्याध्यापिका अर्चना आनावडे,उपमुख्याध्यापिका कल्पना चालीकवार संस्थेच्या अध्यक्षा ज्योती कैलासे, परीक्षा प्रमुख विद्या वाघमारे,मीरा वडजे, सुवर्णा पेठकर, कृष्णा गोंड संदीप ढवळे, फरद सत्तार यांनी प्रयत्न केला.