
नांदेड| १ फेब्रु. रोजी श्री. श्री. रवीशंकरजी यांच्या सान्निध्यात संपन्न होणार्या महासत्संग गुरुवाणी कार्यक्रमासाठी नांदेडमधील सर्वांनी एकत्र येऊन अद्वितीय करावा असे आवाहन माजी राज्यमंत्री व कार्यक्रमाचे सहस्वागताध्यक्ष डी.पी. सावंत यांनी व्यासपीठाच्या भूमीपूजनाच्या वेळी केला.


यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, “मा. अशोक चव्हाण यांना स्वागताध्यक्ष म्हणून सन्मान दिला हा आनंद आहेच”. श्री.श्री. रवीशंकरजी यांच्या लोकप्रियतेमुळे भाविक भक्ताच्या उपस्थिती व कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्द्ल विश्वास व्यक्त केला.


कार्यक्रम समन्वयक मकरंद जाधव यांनी प्रास्ताविक केले. जिल्ह्यात अनेक गावात स्वामी अशोकजी, स्वामी शाश्वतजी, व स्वामी कल्याणकरजी यांच्या उपस्थितीत गावागावात पदयात्रा सुरू आहेत व भक्तांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यावेळी त्यांनी अशी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी कामाजी पवार, राजू काळे, यांच्यासोबत आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक, स्वयंसेवक, साधक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

