
लोहा| मराठी भाषेची व साहित्याची थोर परंपरा आहे. या परंपरेत मध्ययुगीन कालखंडात संत-पंत-तंत सारख्या संप्रदायांनी वेगवेगळ्या प्रकारची काव्यरचना करून मराठी भाषेचे संवर्धन केले. पुढे आधुनिक काळातही अनेक नामवंत साहित्यिकांनी आपल्या सृजनात्मक याेगदानातून मराठी भाषेचे संवर्धनच केले आहे. पण आजच्या यांत्रिकीकरणाच्या काळात मराठी भाषेची गळचेपी सुरू असून, परकीय भाषा वरचढ ठरते आहे. तेव्हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा वेगवेगळे उपक्रम राबवून यांत्रिकीकरणाच्या या काळात मराठी भाषेचे संवर्धन करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ,भाषा संकुल विभागाचे प्राध्यापक डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी केले.


लोह्याच्या श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय, येथील मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाराती विद्यापीठ सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. अशोकराव गवते होते तर यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष व्हि.जी.चव्हाण, मराठी विभागप्रमुख प्राे.नानासाहेब सूर्यवंशी, प्रा.नवनाथ बेंडे उपस्थित हाेते.


लेखक डॉ वैजनाथ अनमूलवाड यांनी मराठी भाषेचे संवर्धन काळाची गरज कशी आहे याचे सविस्तर विवेचन केले महाविद्यालयिन स्तरावर मराठी भाषेच्या सवर्धना साठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आजच्या सोशल मीडियाच्या काळात जेथे परकीय भाषेचे आक्रमण होते आहे असा व्यवस्थेत आपण आपली मातृभाषा जतन करणे काळाची गरज आहे असे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले


अध्यक्षीय समारोप प्राचार्य डाॅ.अशाेकराव गवते यांनी केला मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. म्हणून आपण मातृभाषेतून व्यक्त झाले पाहिजेत. नवोदित कवींनी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी काव्य लेखन करून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी कट्ट्यावरून कविता सादर केल्या पाहिजेत.अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमात मराठी विभागाच्या वतीने आयाेजित निबंध स्पर्धेतील गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या स्पर्धकांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. नानासाहेब सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. बी.एम.कदम यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रा. एन.एन.बेंडे यांनी पार पाडली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
