
हिमायतनगर। आज दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये मैदानी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन हिमायतनगर तालुक्याचे गट विस्तार अधिकारी (BDO) मयूर अंदेलवाड व नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी (BEO) माननीय शिवाचार्य, तसेच विस्तार अधिकारी अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


याप्रसंगी BDO साहेब यांनी विद्यार्थिनींना अनमोल असे मार्गदर्शन करून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले असे जाहीर केले. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री गजानन रणखांब पर्यवेक्षक श्री साखरे सर, क्रीडा शिक्षक श्री मुनेश्वर सर,श्री जाधव सर व सय्यद सर यांची उपस्थिती होती.

