Monday, February 6, 2023
Home नांदेड राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी शंकर सिंह ठाकुर यांची दुसर्यांदा फेर निवड -NNL

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी शंकर सिंह ठाकुर यांची दुसर्यांदा फेर निवड -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड। नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ पत्रकार तथा शोध पत्रकारितेत हातखंड असलेले निर्भीड पत्रकार शंकर सिंह ठाकुर यांची दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष संतोष जाधव साहेब, सचिव निलेश ठाकरे साहेब, कार्याध्यक्ष दशरथ रोडे साहेब, मराठवाडा अध्यक्ष अशोक दादा वायवळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गोपाळराव लाड साहेब यांच्या उपस्थित सदरील निवडीचा कार्यक्रम पुरोगामी पत्रकार संघाच्या मानवत येथील कार्यालयात पार पडला.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा सहावा वर्धापन दिन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे काही दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या सर्वच कानाकोपऱ्यातून पुरोगामी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी तसेच पत्रकार बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या कार्यक्रमानंतर नांदेड येथील शंकर सिंह ठाकुर व अन्य पदाधिकारी यांच्या निवडी मानवत येथे जाहीर करण्यात आल्या. शंकर सिंह ठाकुर यांनी यापूर्वी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून एक वर्ष कार्य अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडले.

जिल्हाभरात विविध उपक्रम त्यांनी राबवले होते. सामाजिक सेवेचा व पत्रकारीतेचा 20 वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांनी ती जबाबदारी सहजपणे सांभाळली होती. सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने “मान कर्तत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सोहळा- 2020” ह्या कार्यक्रमात दि.22 जानेवारी 2021 रोजी शिर्डी येथे “आदर्श पत्रकारिता” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. पुरोगामी पत्रकार संघात दुसऱ्यांदा निवड झाल्याने पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष पदी दुसऱ्यांदा मारोती शिकारे यांची निवड झाली व महासचिव पदी प्रकाश कोल्हे तर पुरोगामी पत्रकार संघ संचलित “माहिती अधिकार समिती” च्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी विठ्ठल घाटे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे मानवत तालुका अध्यक्ष सावळे साहेब, सामाजिक कार्यकर्ते, अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.ह्या सर्वांच्या निवडी बद्दल नांदेड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मित्र परिवार, सामाजिक, राजकीय, व्यापारी क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!