
हिमायतनगर| येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय मतदार दिन सामूहिक मतदार शपथ वाचन” घेऊन साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. वसंत कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. प्रवीण सावंत हे लाभले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंचावरील मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व तदनंतर मंचावरील मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची थोडक्यात प्रस्तावना करण्यात आली.


तसेच कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राध्यापक डॉ. एल. बी. डोंगरे यांनी राष्ट्रीय मतदार दिनाविषयी अनमोल मार्गदर्शन करुन राष्ट्रीय मतदार दिन का साजरा करावा हे पटवून दिले. आणि विद्यार्थ्यासह उपस्थितांकडून त्यांनी सामूहिक मतदार शपथ वाचन करून घेतली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन तथा आभार कार्यक्रमाचे संयोजक असलेले राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे संपूर्ण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

