Monday, February 6, 2023
Home क्रीडा ऑलम्पिक राऊंडचे सुवर्णपदक मिळवित सृष्टी जोगदंडची वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड -NNL

ऑलम्पिक राऊंडचे सुवर्णपदक मिळवित सृष्टी जोगदंडची वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड -NNL

तर मिक्स टीम मध्ये मार्तंड व सृष्टी रौप्य पदकांचे मानकरी!

by nandednewslive
0 comment

नांदेड| महाराष्ट्र धनविद्या संघटना व भंडारा जिल्हा धनुर्वीद्या संघटनेच्या वतीने दिनांक 20 ते 22 जानेवारी 2023 दरम्यान आयोजित 19 व्या सीनियर धनुर्विद्या आमदार चषक स्पर्धेचे आयोजन दसरा मैदान भंडारा येथे करण्यात आले होते.त्यात नांदेडच्या सृष्टी बालाजी पाटील जोगदंड ने ऑलम्पिक राउंड मध्ये आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत नांदेडच्या इतिहासातले वरिष्ठ गटाचे पहिले सुवर्णपदक मिळत दुसऱ्यांदा सिनियर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये दिमाखात आपला प्रवेश केला आहे.

या स्पर्धेत मिक्स प्रकारात खेळताना नांदेडचा गोल्डन बॉय मार्तंड बालाजी चेरले व सृष्टी बालाजी पाटील जोगदंड यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत रोपे पदक मिळविले आश्चर्याची बाब म्हणजे काही प्रस्थापित मिक्स टीमच्या संघाला हरवण्यासाठी अनेकांनी नांदेडच्या प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड यांच्याकडे शर्यती लावल्या त्यात तंतोतंत यशस्वी खेळ करत अनेक जिल्याच्या प्रस्तापित खेळाडूना हरवत मार्तंड व सृष्टीने रोप्य पदक पटकावले .तर नांदेडच्या वरिष्ठ गटात सर्वात लहान खेळाडू म्हणून खेळणाऱ्या 14 वर्षाच्या ज्ञानेश बालाजी चिरलेले टॉप 32 मध्ये येत आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा वयाने दुप्पट असणाऱ्या अशा यशदीप भोगे यास ऑलिंपिक राउंड मध्ये टफ देत त्याला टाय शॉर्ट वर आणले यावेळी मैदानावरील अनेकांनी ज्ञानेश च्या कार्याची कौतुक केले.

विजेत्यांच्या या यशाबद्दल राष्ट्रीय धनुर्विद्या संघटनेचे महासचिव प्रमुख चांदुरकर राज्य संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट प्रशांत देशपांडे ओलंपिक प्रशिक्षक रविशंकर सर, प्रशिक्षीका पिंकी राणी,ब्रिजेश कुमार डॉ. हंसराज वैद्य विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, डॉ. रविंद्र सिंगल,वृषाली पाटील जोगदंड मनपा सहाय्यक आयुक्त तथा स्टेडियम व्यवस्थापक रमेश चौरे अविनाश बारगजे शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रविण बोरसे, जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष रमेश पारे,ओलंपिक संघटना सचिव बालाजी पाटील जोगदंड उपाध्यक्ष विक्रांत खेडकर , शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गुपिले,जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार , गंगा लाल यादव,आनंद बोबडे शासकीय प्रशिक्षक अनिल बंदेल ,

संघटना सहसचिव नारायन गिरगावकर, संजय चव्हाण, संपादक शाम कांबळे,क्रीडाधिकारी प्रविण कोंडेकर शिवकांता देशमुख, संतोष कनकावार,सुरेश तमलुरकर, डॉ. रमेश नांदेडकर, रमन बैनवाड, राजेश जांभळे, एकनाथ पाटील,मालोजी कांबळे श्रीनिवास भुसेवार, राजेंद्र सुगावकर ,प्रेम जाधव , प्राचार्य मनोहर सुर्यवंशी , बाबू गंदपवाड, सरदार अवतारसिग रामगडीया, डॉ. भिमसिंग मुनिम, मुन्ना कदम कोंडेकर , शिवाजी केंद्रे, ज्ञानोबा नागरगोजे, एस.एम. तेहरा , शिवाजी पुजरवाड ,उद्धव जगताप यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!