
लोहा| शहरात वटपौर्णिमा व हळदी कुंकूचा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो. त्या कार्यक्रमास शहरातील महिलांची मोठी संख्या आवर्जून उपस्थित असतात .यंदाही चिखलीकर परिवाराच्या वतीने खा चिखलीकर यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाताई चिखलीकर व भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांच्या उपस्थितीत शहराती गोविंद गार्डन मध्ये हा कार्यक्रम पार पडला


लोह्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही चिखलीकर कुटुंबियांच्या वतीने हळदी कुंकूवाचा कार्यक्रम गोविंद गार्डन मध्ये घेण्यात आला होता. आज लोहा येथील गोविंद गार्डन येथे चिखलीकर परिवाराच्या वतीने व सर्व महिला भगिनींच्या साक्षीने भव्य दिव्य हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला.


भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ प्रणिता देवरे चिखलीकर,सौ.प्रतिभा प्रतापराव पा.चिखलीकर, सौ.वैशाली प्रवीण पाटील चिखलीकर,सौ.सोनाली संदिप चिखलीकर,सौ.संजीवनी गणेशराव गाढे, नगरसेविका कल्पनाताई मुकदम, माजी प स सदस्या सौ.सुरेखा दत्ता वाले, माजी नगरसेविका शोभाताई बगडे नळगे यांनी महिलांना तिळगुळ दिले व शुभेच्छा दिल्या .महिलांच्या सन्मानासह त्यांच्या प्रगतीवर प्राणिताताई यांनी भाष्य केले हा स्नेह व जिव्हाळा अतूट असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

