
नवीन नांदेड। भागातील राजश्री पब्लिक स्कूल लातूर रोड नांदेड येथे स्वयंशासन दिन (स्कूल डे) उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेचे सचिव मा. दिलीप पाटील , संचालिका डॉ. सौ. कल्पना पाटील , व्यवस्थापक सुशांत पाटील ,मुख्याध्यापक बी. के. फुले , महेंद्र कांबळे आदीनीं स्वयंशासन दिनात सहभागी विध्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. या सर्व उपक्रमाचे नियोजन शाळेतील सहशिक्षक राजकुमार कोकाटे , सुबोध पाटील , जॉन सूर्यवंशी , मोहन जाधव यांनी केले होते.


शाळेच्या सकाळ सत्र व दुपार सत्र या दोन्ही सत्रात पाचवी व दहावीच्या विध्यार्थ्यांकडून स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. अगदी सकाळच्या शालेय परिपाठ, पी. टी. पासून वर्गावरील अध्यापन तसेच कला, कार्य व शारीरिक शिक्षण यामध्ये पाचवी व दहावीच्या सर्व विद्यार्थी आणि विध्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. विध्यार्थ्यांनी दिवसभर अध्ययन-अध्यापन केले संपूर्ण शाळेचे कार्य पाहिले. आजच्या दिवसाचे सकाळ सत्राचे मुख्याध्यापक पद पाचवी वर्गातील स्वप्नील माळी याने सांभाळले तसेच दुपार सत्राचे मुख्याध्यापक पद दहावी वर्गातील संजय कदम याने सांभाळले.


यांच्यासह पाचवी वर्गातील तेजस्वी चौधरी, अंजली कदम, दिव्या येवले, जिजाऊ मोरे, श्रावणी येवले, श्रद्धा पवार, रिया शिंदे, माही शिंदे, संध्या लामदाडे, तनया कदम, पौर्णिमा बोडके, सायली काळे, श्रावणी सलगर, आनंद कदम, हर्ष भदरगे कार्तिक पावडे, गणेश येवले, प्रशांत तिवारी, अनिकेत स्वामी, देवराव मुंगल, श्रीराम शिंदे, बालाजी कारले, अर्जुन हराले, हरी कोकणे, लक्ष्मण मिसे, पृथ्वीराज माने, गजानन माने, दीपक माने, परमेश्वर पारसे, अनिकेत बोडके, सिकंदर चव्हाण.


दहावी वर्गातील समीक्षा पवळे, श्रेया दिवटे, प्रियंका सरकुंडे, सोनी वावधाने, सुरेखा ढाले, रोहिणी दुधाडे, शिवराज जाधव, विश्वजित ढगे, मुकुंद जाधव, अंकुश बोरकर, वैभव हिवंत, गणेश ढगे, अनिरुद्ध वाघमारे, यश कवटिकवार, सुरज पुयड, विद्यानंद कानकाटे, शुभम पुयड, वैभव येवले, मजर शेख, शैलेश बोडके, फैझान पठाण, कृष्णा कदम, प्रदीप डवरे, रोशन गारोळे इत्यादी या सर्वांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बनून शालेय कार्यात सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सहशिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.
