Thursday, February 2, 2023
Home कृषी ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदवण्यासाठी विशेष मोहिम -NNL

ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदवण्यासाठी विशेष मोहिम -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड| जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ॲपद्वारे पीक पेरा नोंदणी करावी. यासाठी 27 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्हाभरात ई-पीक पेरा नोंदणीसाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे.

ही मोहिम यशस्वी करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, शेतीमित्र, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी अशा स्वयंसेवकांच्या सहकार्याने ई-पीक पेरा नोंदवण्याची मोहिम पार पाडण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपमध्ये ई-पीक पेरा अचूक नोंद करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

क्षेत्रीय स्तरावरून पीक पाहणी Real time crop data संकलित होण्याच्यादृष्टिने तसेच सदर डाटा / माहिती संकलन करतांना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे.

या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲप चालू करून त्यात पीक पाहणी नोंदवण्याची नवीन पद्धत शासनाने सुरू केली आहे. पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळण्यासाठी, पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेचा आहे.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!