
अर्धापुर, निळकंठ मदने| जिल्हाधिकारी नांदेड तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत,अपर जिल्हाधिकारी नांदेड पी एस बोरगांवकर,उप जिल्हा निवडणूक अधिकारी संतोषी देवकुळे,उप विभागीय अधिकारी नांदेड विकास माने,प्रभारी उप विभागीय अधिकारी भोकर तथा मतदान नोंदणी अधिकारी सुजित नरहरे यांच्या मार्गदर्शन नुसार 25 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय मतदार दिनी अर्धापुर तालुक्यात विविध उपक्रम घेवून साजरा करण्यात आले.


शासकिय कार्यालय, शाळा महाविद्यालयात, उच्च माध्यमिक महाविद्यालयात,जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेत मतदारासाठीची प्रतिज्ञा घेवून प्रत्येक निवडणूकित निर्भयपणे तसेच धर्म,वंश,जात,समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.


तसेच शाळा महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, भितीपत्रक,निबंध स्पर्धा,प्रभात फेरी व्दारे निवडणूक मतदान जनजागृती करण्यात आली,देशभक्तीपर गीत अदि उपक्रम तहसिलदार उज्वला पांगरकर यांचे मार्गदर्शनाखाली हे उपक्रम घेण्यात आले व नायब तहसीलदार सुनील माचेवाड व मारोती जगताप यांनी नियोजन केले. राष्ट्रीय मतदार दिनी घेतलेले निबंध स्पर्धा व भित्तीपत्रक यांचे चित्रप्रदर्शन तहसिल कार्यालयात 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी ठेवण्यात आले आहे.

