
नांदेड। पतंजली योगपीठ परिवारातर्फे कैलास नगर हनुमान मंदिर ठिकाणी सकाळी 7.30 वाजता संकल्प यज्ञ करण्यात आला. सर्वांनी नांदेड जिल्हा योगमय करण्याचा संकल्प केला.

जागा तिथे योग शिबिरे लावणे, योग शिक्षक बनवणे, नेहमीच योग वर्गांचा विस्तार करणे, घरोघरी योगाचा प्रसार करणे, स्वदेशी वस्तूचा वापर करण्याचे ठरवले, लगेच ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी भारत स्वाभिमान, पतंजली योग समिती, पतंजली किसान सेवा समिती, युवा भारत, सोशल मीडिया व महिला पतंजली योग समितीचे आदरणीय सिताराम सोनटक्के, सुरेश लंगडापुरे, हनुमंत ढगे,

महारुद्र माळगे, रावसाहेब साजने, अनिल अमृतवार, वसंतराव कल्याणकर, पंढरीनाथ कंठेवाड, देवेश सलगरकर, अशोक कुरुडे, रमेश दमकोंडवार, देविदास लाटकर, मुंजाजी जाधव, रामराव चव्हाण, लक्ष्मीकांत फुके, महानंदा माळगे, अनिता सोनटक्के, पद्मा रुद्रवार, ज्योती डोईफोडे, सुरेखा घोगरे, राणी दळवी, उर्मिला साजने, स्वाती बेंबरे, चंदा हळदे पाटील, सुनिता डांगे, दिलीप आघाव, यशोदाबाई शिंदे, पूजा पांडागळे, शिवाजी शिंदे हळदेकर,

अनिल कदम, शिवाजी मुलंगे, रामकृष्ण चक्रवार, नामदेव मोहिते, उत्तमराव वट्टमवार, दिगंबर पाटिल, दिगंबर कुऱ्हाडे, दिगंबर पाटील, शशिकला भरणे, सुनिता आलमपल्लेवार, जोशना भोल, शालिनी शेळके,लता धूमपलवार, सुंदरबाई हळदे, आदी मान्यवर उपस्थित होते असे अनिल अमृतवार यांनी सांगितले

