
भोकर, गंगाधर पडवळे। शिक्षक मतदार संघाच्या निवडून प्रचाराला सुरुवात झाली असून त्या निमित्ताने नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर व जिल्ह्यातील सर्व वरिष्ट पदाधिकारी यांनी भोकर येथे त्या निमित्त मतदार शिक्षकां सोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असता येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा. किरण पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्या तुमच्या सर्व समस्या,मागण्या आम्ही खात्रीने पूर्ण करू असे यावेळी आश्वासित केले.


प्रा. किरण पाटील यांच्या प्रचारार्थ भोकर तालुका नियोजन बैठकीचे आयोजन भोकर शहरातील माऊली फँक्शन हॉल येथे करण्यात आले होते या नियोजन बैठकीचे मार्गदर्शक खा. प्रताप पाटील चिखलीकर, डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर,हे होते तर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, आणि प्रमुख पाहुणे म्हणून गंगाधरराव जोशी, डॉ. माधवराव उंचेकर यांची उपस्थिती होती. मंचावर जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के,गणेश पाटील कापसे, तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळूधकर, सुभाष पाटील कोळगावकर, आदींची उपस्थिती होती.


सदरील बैठकीत शिक्षकांच्या समस्या जानुन घेऊन खा. प्रताप पाटील म्हणाले की प्रश्न पेन्शन चा असो, अनुदानचा असो,या अनुदाणोत्तर,अनुदानचा अथवा इतर कोणतेही असो आमचे सरकार तुमच्या बद्दल सकारात्मक आहे परवाच मुख्यमंत्री यांनी तसे विधानही केले असून या निवडणुकी नंतर ते नक्कीच तुमच्यासाठी चांगला, योग्य तो निर्णय घेतील यात शंका नाही.


परंतु तुमच्या सर्व समस्या, अडी अडचणी सोडविण्यासाठी एक चांगला सक्षम, हुशार, उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टी ने व मित्र पक्षाने प्रा. किरण पाटील यांना निवडणूक रिंगणात उभे केलं आहे त्या साठी भोकर तालुक्यातील सर्व मतदार शिक्षक बंधू, भगिनींनी भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी विनंती केली आहे. सध्या राज्यात पाच ही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येण्यासारखी परिस्थिती आहे त्या मुळे भोकर तालुका या बाबतीत भारतीय जनता पार्टी च्या उमेदवारा सोबत राहिला पाहिजे असे ही ते यावेळी म्हणाले तत्पूर्वी शहरातील श्री शाहू महाराज विद्यालय येथे ही धावती भेट देऊन तेथीलही शिक्षकांचे मते मिळविण्यासाठी त्यानां मार्गदर्शन करून प्रयत्न केला.
