
कंधार,सचिन मोरे। लोहा येथील उप-जिल्हा रुग्णालयाच्या ठेकेदाराची चौकशी करून कठोर कार्यवाही करा.व कंधार येथील उप-जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम चालु असुन हे काम योग्य व मजबूत व्हावे या करीता खबरदारी घेऊन कार्यक्षम रहा अशा आशयाचे निवेदन माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनीक बांधकाम विभाग नांदेड यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.


दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे.की लोहा उप-जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे काम सा.बा नांदेड विभागाने कोणत्या ठेकेदाराला दिले त्यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध कडक शासन व दंड लावणे त्याच बरोबर कंधार येथे नवीन उप-जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे काम त्याच गुत्तेदाराला दिले असल्यास ताबडतोब त्यांना त्या कामाबदल समज देणे गरजेचे आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून असे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला कायमचे बाद करणे गरजेचे आहे. त्याच ठेकेदाराला कंधारचे काम दिले असल्यास आताच कामात सुधारणा करणे पण गरजेचे आहे.


दुसरा गुत्तेदार असेल तर त्यांना सूचना देऊन काम योग्य व मजबूत होईल या बदल त्यास समज द्यावी अन्यथा कंधार ची जनता असे बोगस काम सहन करणार नाही ? याची नोंद घ्यावी आपल्या खात्याचे तज्ञ लोक देखरेखीला असताना अशा बोगस कामाला कशी काय परवानगी दिली गेली ? याची पण चौकशी करणे गरजेचे आहे. आरोग्य खात्याच्या अधिका-यांनी पण या बांधकामाकडे वारंवार लक्ष देऊन लोहा इमारती प्रमाणे त्रूटी व बोगसपणा होणार नाही.


याची काळजी घ्यावी व जनतेचे कोट्यावधी रुपये खर्च करून जनतेच्या आरोग्याची सोय ज्या इमारतीत होणार ती इमारत अशी होणे म्हणजे आरोग्य खाते सुद्धा आंधळे होता कामा नये ? टक्केवारीच्या धंद्यात जनतेच्या जीवावर असा पोरखळ अत्यंत निंदनीय व कडक शासन करण्याजोगा आहे. या बाबतीत वरील दोन्ही ही खात्याने तात्काळ दखल घेऊन सुधारणा करावी अन्यथा कंधारच्या जनतेलाच या बाबत कडक उपाय करावा लागेल. असा गर्भित इशारा निवेदनाच्या शेवटी माजी आमदार कुरुडे यांनी दिला आहे.
