
उस्माननगर, माणिक भिसे। लाठ ( खु.) ता.कंधार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक दत्ता गादेकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून भारतीय ७५ वा .प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

जि.प. प्रा.शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून सकाळी गावातून प्रमुख रस्त्याने प्रभात फेरी काढण्यात आली.सकाळी शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्ता गादेकर यांच्या शुभ हस्ते शाळेचा ध्वजारोहन झाले .त्यानंतर शाळेतील मुलींनी ” मैं भारत की बेटी हू ” यागितावर लेझिम नृत्य सादर केले.उपस्थित सर्व पालक वर्गानी टाळ्या वाजवून दाद दिली .

लगेच शाळेतील पूर्वी इंगोले,पुनम गवारे,स्वराज,गवारे, सह्याद्री इंगोले,समीक्षा घोरबंड,वैष्णवी घोरबांड,अदिती जाधव, श्रेया इंगोले, अनुष इंगोले,उत्कर्ष शिंदे,प्रतीक्षा इंगोले,श्रुती इंगोले,हिंदवी गवारे,शिवानी घोरबांड ,श्रद्धा कानगुळे,प्रणाली झडते,पायल इंगोले, सिमरन शेख,दुर्गा तुंबरफले,अंकिता बाबळे, भाग्यश्री इंगोले,योगेश्वरी इंगोले इंगोले,या विद्यार्थ्यांनी विविध विषयावर समयोचित भाषणे केली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सुरेल आवाजात सादरीकरण केले .

इयता पहिलीतील विद्यार्थ्यांनी इंग्रजीतील कवितांचे अभिनयासह सादर केली. इयता सातवीतील विद्यार्थ्यांनी ” झाडे लावा , देश वाचवा “यावर मूक अभिनय सादर केला. इयता सहवितील विद्यार्थ्यानी देश रंगीला हे गीत अभिनयासह सादर केले. इयता सहावी व सातवी च्या विद्यार्थ्यानी स्त्री शिक्षणाचे महत्त्व यावर आधारित नाटिका सादर केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री प्रकाश ताटे सर यांनी केले व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक श्री दत्ता गादेकर यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.नभा कुलकर्णी,व्यंकट कपाळे,बालाजी कांदे,गजानन चक्रावर,नागोराव उद्बुके,प्रकाश ताटे,प्रदीप धुळशेट्टे,या सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमासाठी शा.व्य स.अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य,सरपंच, ग्रामसेवक,उपसरपंच,चेअरमन,तंटामुक्ती अध्यक्ष,सर्व आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी ताई,गावातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

