
उस्माननगर,माणिक भिसे। सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेच्या वतीने भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य लेझीम पेशवाई पोशाखातील हिंदी , मराठी व देशभक्ती गीतावरील सादरीकरण करून , प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रॅलीला पाहण्यासाठी गावातील महिला पुरुषांनी तोबा गर्दी केली होती.

भारतीय प्रजासत्ताक दिनी सकाळी संस्थेचे अध्यक्ष देवरावजी सोनसळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावातील तुकाराम वारकड गुरुजी, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती , साजिद काजी , बाबुराव पाटील घोरबांड, उपसरपंच शेख बाशिद ,व्यंकटराव पाटील घोरबांड, बालाजी पुंडाजी घोरबांड, वैजनाथ पाटील घोरबांड , नरेश शिंदे, सूर्यकांत माली पाटील यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्व उपस्थित प्रतिष्ठित नागरिक यांचे शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

त्यानंतर गावातील प्रमुख रस्त्याने देशभक्ती व मराठमोळ्या हिंदी , मराठी गीतावर लेझीमद्वारे पेशवाई पोशाखातून भव्य प्रभात फेरीत विद्यार्थी , विद्यार्थ्यांनीनी चालीवर ठेका धरला होता. यावेळी जागोजागी गावकऱ्यांनी फटाके वाजवून शाळेच्या प्रभात फेरीचे स्वागत केले. व शिक्षणप्रेमी गोविंदराव सं. पाटील घोरबांड यांनी विद्यार्थ्यांना पारले जी बिस्किट वाटप केले.

सम्राट अशोक प्राथमिक शाळेच्या लेझीम पेशवाई पोशाखातील प्रभात फेरीतील सादरीकरण पाहाण्यासाठी महिला ,पुरुषांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती . यावेळी शाळेतील शिक्षक देविदास डांगे, भगवान राक्षसमारे, मन्मथ केसे, नितिन लाटकर, सौ. प्रियदर्शिनीताई सोनसळे ,श्रीमती समताबाई जोंधळे ,सौ.रोहिणी सोनकांबळे ,मणिषा भालेराव, शकील शेख यांनी प्रभातफेरी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

